नमस्कार, सदर संकेतस्थळाचे उदघाटन मराठी भाषा दिनी माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले आहे.    
         
 
 
 

मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे यातच त्याचा लौकीक आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावर वसले आहे. मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार, रिझर्व बॅंका यांसरख्या आर्थिक संस्था येथे स्थित आहेत. अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये येथे आहेत. त्यामुळे व्यापार तसेच नोकरीच्या संधी येथे उपलब्ध होत असतात. तसेच सिनेमा, चित्रपट यासाठी तर येथे भरपुर वाव असल्याकारणाने मुंबई बाहेरील लोकही आपल्या संधीचे सोन करू पाहतात. खर पाहता मुंबई हे एक अजबच रसायन आहे इथे एखाद्याची "बनी तो बनी नाहीतर अब्दुल गनी" खूप माणसं इथे येतात संघर्ष करतात आणि राहतात मग सहजचं इथले पक्के "मुंबईकर" होऊन जातात. पंजाब असो व बंगाल-काश्मीर असो व कन्याकुमारी कुठूनही कोणीही येवो हि जादूनगरी सर्वांना आपल्यात सामावून घेते. ७ बेटांवर वसलेले हे शहर सप्तरंग प्रमाणे विखुरलेल्या देशाच्या या जनतेस एकत्र आणते. पाशान युगापासून इतिहासात उल्लेखलेली हि मुंबई नगरी आज देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. काय नाहीय या मुंबईत गावच्या शेजा-याप्रमाणे चाळीतले शेजारपण ते अमेरीकेतल्या गगनचुंबी ईमारतीप्रमाणे फ्लॅटचा चकचकीतपणा असो, इथे सर्व मिळते. रस्त्याची वाहतूक असो व ट्रेन ची जहाजाची सफर असो, विमानाची सफर इथे कसाही फिरा हि जादूई नागरी फिरवणार. पाणीपुरी असो वा पंजाबी डिश असो, साउथ इंडियन असो चायनीज जें असो इथे तेही मिळणार. एवढचं काय खूप मजा करणे म्हणजे "जीवाची मुंबई करणे" असा वाक्यप्रचारही मुंबई च्या नावावरून रूढ झालाय.